जयपूर
election result निवडणुकांमध्ये अनेक वेगवेगळे विक्रम होत असतात. कोणी सर्वाधिक मतांनी निवडून येतो तर कोणाचा सर्वात कमी मतांनी पराभव होतो. मात्र, राजस्थानात एक वेगळाच विक्रम घडला आहे. डिडवाना जिल्ह्यातील पालिका निवडणुकीच्या निकालात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका उमेदवाराला फक्त एकच मत मिळाले आहे. उमेदवाराच्या पत्नीसह आई-वडिलांचे मत देखील त्याच्या पारड्यात पडले नाही. कैलाश चंद्र असे या दुर्दैवी उमेदवाराचे नाव आहे.
परबतनगर नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाकडून कैलाश चंद्रने निवडणूक लढवली. पण, त्यांना फक्त स्वत:चेच एक मत मिळाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना का मत दिले नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला. तर उत्तरादाखल समजले की त्याच्या कुटुंबीयांनी मतदानच केले नाही. विजयाची खात्री असलेल्या उमेदवाराला निकालानंतर जबर धक्का बसला आहे. नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाèया सत्तापक्षातील उमेदवारालाच एक मत मिळणे, या प्रकाराने खळबळ माजली आहे. त्यामुळे याची चर्चा राज्यभरात होते आहे.
या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार हिना खानम विजयी झाल्या आहेत. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या उमेदवारालाही कैलाश चंद्र यांच्यासारखाच धक्का बसला. पण, त्यांच्या पक्षाचा म्हणावा तसा प्रभाव नव्हताच.
कैलाश चंद्र यांची प्रतिक्रिया
इतक्या दारुण पराभवानंतर कैलाश चंद्र यांची नेमकी प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते अतिशय आशावादी दिसले. ते म्हणाले, या ठिकाणी एक मत मिळवणेही खूप अवघड होते.