दिल्लीतील तीन शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवले

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
bomb threat दिल्लीतील तीन शाळांना मंगळवारी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. धमकीचा ईमेल मिळताच संबंधित शाळांमध्ये तातडीने सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
 


delhi schools receive bomb threat via email, students evacuated as security checks launched 
दिल्ली अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, धौला कुआं परिसरातील ‘आर्मी पब्लिक स्कूल’मधून बॉम्बच्या धमकीसंदर्भातील पहिला कॉल प्राप्त झाला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शाळेच्या परिसराची कसून तपासणी केली.तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे संबंधित धमकी केवळ अफवा असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती गांभीर्याने घेत शाळांमध्ये तपासणी केली.
तीन शाळांना एकाच वेळी ईमेलद्वारे धमकी मिळाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. धमकीमागील नेमके कारण काय, तसेच ईमेल कोठून पाठवण्यात आला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.