मातृत्वाकडे पाहण्याच्या मानसिक बदलांवर चर्चा

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
नागपूर:
mindset regarding motherhood मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्जनशील, आनंददायी आणि निसर्गदत्त अनुभव आहे. मात्र, बदलत्या सामाजिक परिस्थितीत मातृत्वाकडे पाहण्याची मानसिकता बदलत आहे. या पृष्ठभूमीवर पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने ‘निसर्गदत्त मातृत्वाला नकार अयोग्य’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
 
 
mindset regarding motherhood
 
 
मेजर हेमंत जकाते पुरस्कृत मातृदिन कार्यक्रमांतर्गत आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ स्वाती धर्माधिकारी होत्या. अध्यक्षीय भाषणात धर्माधिकारी यांनी आधीची आणि आजची पिढी यांच्या मानसिकतेतील बदलांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ऊहापोह केला. डॉ. सरिता भोंसुले यांनी मातृत्व स्वीकारण्याचे शारीरिक व मानसिक आरोग्याशी असलेले विविध पैलू स्पष्ट केले. विवाहाचे वाढते वय आणि त्यानंतर मातृत्व लांबविण्याची प्रवृत्ती यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. श्वेता कुळकर्णी यांनी मातृत्व कधीही स्त्रीच्या कर्तृत्वाच्या आड येत नाही, उलट त्यातून व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते, असे मत व्यक्त केले. सोनल फुके यांनी शिक्षण, विवाह यामुळे मातृत्वाचे वय पुढे गेल्यानंतर काही कारणांमुळे मातृत्व स्वीकारता न आल्यास दत्तक घेण्याच्या पर्यायाचाही कुटुंबाने सर्वानुमते विचार करावा, असे मत मांडले.mindset regarding motherhood अवंतिका पिंपळकर यांनी ‘जेन झी’चे प्रतिनिधित्व करताना आजच्या पिढीने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. मनीषा देशमुख यांनी विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रभा देऊस्कर यांनी केले. आयोजन डॉ. अंजली पारनंदीवार यांनी केले. कार्यक्रमासाठी संगीता वाईकर, भाग्यश्री करजगावकर, वृंदा जोगळेकर, रश्मी वाघमारे आणि राधा खानझोडे यांनी परिश्रम घेतले.