ganapati wardha वर्धेकर, वर्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्वच्छतेच्या कितीही गप्पा मारत असले तरी गोलबाजार परिसरापर्यंत स्वच्छता पोहोचूच शकली नाही. गोल बाजारात टिळकांचा पुतळा बसवल्या गेला. टिळक उद्यान अशी ओळख झाली. पण, ती ओळख औत घटकेचीच ठरली. आता टिळक उद्यान आणि टिळकांचा पुतळा गेल्या २५ वर्षांपासुन खाणेच्या साम्राज्यात होता. या पुतळ्यापरिसरात स्वच्छता व्हावी यासाठी ‘तरुण भारत’चा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी आवाहन केल्यानुसार अ. भा. आर्यसंघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने त्या ठिकाणी गणेश स्थापनेची जबाबदारी स्वीकारली. आज त्याच ठिकाणी ‘टिळकांचा गणपती’ची स्थापना करण्यात आली.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात टिळकांचे गोलबाजार परिसरात भाषण झाले. त्याच ठिकाणी त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली. तत्कालीन नगराध्यक्ष शेंडे यांनी १९८३ मध्ये गोल बाजारात टिळकांचा रेखीव पुतळा बसवला आणि त्या परिसराला टिळक बगीचा असे नाव देण्यात आले. याच भागाला गोलबाजार म्हणून अशी ओळख आहेच. मात्र, या परिसराची गरिमा नगर पालिका कायम राखू शकले नाही. पुतळ्याच्या परिसरात कचरा जमा होऊ लागला. हळूहळू घाणीचे साम्राज्यही वाढू लागले. परिसरातील लोकांना लघुशंकेकरिता ती हकाची जागा झाली. आज फत टिळकांच्या पुतळ्यावर तेवढी घाण नाही आणि टिळकांचा पुतळ्याचा एक दीड फुटाचा परिसर सोडला तर तेथेही लघुशंका केली जाते. दरम्यान, नगर पालिकेत भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली. पण, टिळक त्यांच्या डोळ्यात भरलेच नाही आणि आजही तो पुतळा घाणीच्या साम्राज्यातच आहे. परंतु, तो परिसरात स्वच्छ रहावा यासाठी तरुण भारत पाठपुरावा करीत असताना १४ ऑगसड रोजी अ. भा. बजरंग दलाच्या पदाधिकार्यांकडे या परिसरात गणेशोत्सव झाल्यास घाणीवर नियंत्रण मिळवणे शय होईल, असा विचार व्यत करण्यात आला आणि अ. भा. आर्यवत संघ, अ. भा. बजरंग दलाच्या वतीने गणेश स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. नगर पालिकेच्या परवानगीने आज त्या ठिकाणी टिळकांच्या गणेशाची अतिशय शांतपणे स्थापना करण्यात आली.
‘टिळकांचा गणपती’च्या वतीने दहाही दिवस आभा कार्ड, रेशन कार्ड, एनएमसी कार्ड शिबिर, आरोग्य शिबिर, रतदान शिबिर, टिळक अग्रलेख प्रदर्शनी, पर्यावरण, वन्य जीव वनस्पती माहिती, प्रदर्शनी एक पेड माँ के नाम, पर्यावरण पुरक गणेश उत्सव माहिती व प्रदर्शनी, वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती शिबिर, सामूहिक अथर्वशीर्ष, महाआरती आदी धार्मिक, सांंस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.