गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
ganpati procession accident  गणपती आगमन सोहळ्याच्या उत्साहाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताने गालबोट लागले. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावाच्या वळणावर गणपती आगमनाच्या मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या अपघातात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. कंटेनरने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
 

ganpati procession accident  
गणपती आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंप्रीराजा गावात मिरवणुकीची तयारी सुरू होती. यासाठी नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले होते. याचवेळी चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील गावाच्या वळणावर भरधाव वेगाने आलेला कंटेनर अचानक मिरवणुकीत घुसला. कंटेनरने रस्त्यावर असलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत काही दुचाकीस्वारांना चिरडत कंटेनर पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेत विठ्ठल राममाळ जाधव आणि रमेश लहूजी बनसोडे या दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य १२ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
गणपती आगमन ganpati procession accident  सोहळ्याच्या आनंदात सहभागी झालेल्या ग्रामस्थांवर अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील वाहतुकीवरही या दुर्घटनेचा परिणाम झाला.
दरम्यान, कंटेनर नेमक्या कोणत्या कारणामुळे मिरवणुकीत घुसला, त्याचा वेग किती होता, तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण कोणत्या कारणामुळे सुटले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या सर्व बाबींचा तपास झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. गणपती आगमनाच्या उत्साहाला लागलेल्या या भीषण अपघातामुळे पिंप्रीराजा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.