१६९ सार्वजनिक गणेश मंडळांकडून बाप्पाची स्थापना

६६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
कारंजा लाड,
ganesha mandal श्रावण महिना संपताच गणेशभक्तांना वेध लागतात ते विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या आगमनाचे. यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, सोमवारी १४ सप्टेंबर रोजी शुभ मुहूर्तावर कारंजा तालुयात गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाचे स्वागत केले. तालुयातील तब्बल १६९ सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून, विशेष म्हणजे ६६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
 
 
ganesha mandal
 
दरम्यान, बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहावरुणराजानेही काही प्रमाणात हजेरी लावल्याने गणेशभक्तांच्या आनंदात भर पडली.
यंदाच्या गणेशोत्सवात कारंजा तालुयात शहरी भागातील ५३ तर ग्रामीण भागातील १२६ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश आहे. गावागावांतील सामाजिक सलोखा, एकोपा आणि शांतता कायम राहावी, या उद्देशाने ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला प्रोत्साहन दिले जात आहे. सन २००७ पासून गावातील तंटे गावातच मिटावेत आणि सार्वजनिक उत्सव शांततेत पार पडावेत, या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या माध्यमातूनही सामाजिक ऐयाला चालना देण्यात आली.या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून यंदा कारंजा तालुयातील ६६ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना स्वीकारली आहे. गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी गणरायाची स्थापना केल्याने सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होत असून, ही बाब ग्रामविकासाच्या दृष्टीनेही सकारात्मक मानली जात आहे.
 
 
गणेशोत्सवानिमित्त कारंजा शहरासह ग्रामीण भागात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याची तयारी केली आहे. यंदाचा गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान कारंजा तालुयातील मंडळांमध्ये उत्साह कायम असून, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, तसेच शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.