पुणे
kalyani nandkishor ‘लागीरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी पुण्यात आपल्यासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना पुण्यातील नवले ब्रिज परिसरात चार जणांनी आपल्या कारला मुद्दाम धडक देऊन ती थांबवली आणि त्यानंतर पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कल्याणी यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर आपल्याला जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात घेऊन जाण्याचाही प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. या झटापटीत हाताला दुखापत झाल्याचेही कल्याणी यांनी नमूद केले आहे.
कल्याणी नंदकिशोर यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या मुंबईहून साताऱ्याकडे प्रवास करत होत्या. नवले ब्रिजजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर गाडी थांबवली. पुढे संबंधित व्यक्तींनी त्यांच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. परिस्थिती चिघळल्यानंतर त्यांना दुसऱ्या वाहनात जबरदस्तीने बसवून नेण्याचाही प्रयत्न झाल्याचे त्यांनी व्हिडीओत सांगितले. या प्रसंगात झालेल्या झटापटीमुळे त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नवले ब्रिज परिसरात काही गुंडांनी अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांची गाडी अडवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्याचे त्यांनी म्हटले. पुण्यात गृहखात्याच्या नाकावर टिच्चून नागरिकांना अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचे सुळे यांनी नमूद केले.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कल्याणी नंदकिशोर यांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करतानाच्या अनुभवाबाबतही कल्याणी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी नर्हे पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. तक्रार