शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्महत्या

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
लातूर
sanjeev sonawane शहरातील प्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने लातूर शहरासह शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यासह पुढील तपास सुरू केला आहे.
 

latur educationist sanjeev sonawane dies by suicide at home, police investigation underway 
मिळालेल्या माहितीनुसार, संजीव सोनवणे यांच्या कुटुंबातील सदस्य परदेशात गेले होते. त्यांच्या पत्नी मुलीकडे गेल्या असल्याने सोनवणे हे घरी एकटेच होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चिठ्ठीतील मजकूर नेमका काय आहे आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
संजीव सोनवणे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास दीर्घ आणि उल्लेखनीय होता. त्यांनी बेंगळुरू येथील सिद्धगंगा कॉलेज, तुमकुर येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील चंद्रभानू सोनवणे हे औरंगाबाद विद्यापीठात हिंदी साहित्य विभागाचे प्रमुख होते. वडिलांकडून मिळालेल्या शैक्षणिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सोनवणे यांनी परळी येथे ‘संकल्प कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली.
यानंतर सुमारे तीन वर्षांनी, सन २००० च्या आसपास त्यांनी लातूरमध्ये ‘संकल्प कोचिंग क्लासेस’ सुरू केले. पुढे २००५ च्या सुमारास चंद्रभानू सोनवणे कॉलेजची स्थापना करण्यात आली. बार्शीजवळील उकडगाव येथेही शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी खडकवासला येथे शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा विस्तार केला होता. खासगी शिकवणीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे विविध शैक्षणिक संस्थांच्या उभारणीपर्यंत पोहोचला.
संजीव सोनवणे यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही इंजिनिअर असून परदेशात नोकरी करतात. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.संजीव सोनवणे यांचे वर्गमित्र आणि बंधू असलेले शिवाजी सोनावणे यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख करताना, घरातील शैक्षणिक वातावरणाला दृष्टी देण्यासाठी संजीव यांनी मोठी मेहनत घेतल्याचे सांगितले. खासगी ट्युशनपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता, असेही त्यांनी नमूद केले. खासगी ट्युशन चालक ते मोठ्या शैक्षणिक संकुलांचे जाळे उभारणारे संस्थाचालक असा त्यांचा प्रवास झाला. सर्वांना सहज, हसत-खेळत भेटणारा आणि जमिनीवर राहून वावरणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख