स्वयंभु पौराणीक गणेश मंदिरात उत्सव सुरू

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
केळझर
swayambhu ganesha temple केळझर हे गणेश मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथील सिद्धी विनायक गणपतीची जशी आख्यायिका आहे तसेच शासकीय तलावाजवळील स्वयंभु पौराणीक गणेश मंदिराचाही इतिहास आहे. गणेश चतुर्थीपासुन येथेही गणेश भतांची दर्शनासाठी गर्दी असते. दुर्देवाने सिद्धी विनायकाला जशी प्रसिद्धी मिळाली अशी मात्र स्वयंभू गणेश मंदिराला मिळालेली नाही.
 
ganesh mandir
शासकीय तलावाच्या बाजूला असलेल्या स्वयंभू गणेश मंदिरात चतुर्थीपासुन गणेशोत्वास प्रारंभ झाला. पहाटे ५ वाजता उत्सव समितीचे सचिव सुनील कावलकर यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक आरती झाला. यावर्षी १२ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
स्वयंभू गणेश स्थान गावाच्या दक्षिण दिशेला बस स्थानकाच्या मागे पाचशे फुटावर आहे. गणेश मुर्ती उत्तराभिमुख डाव्या सोंडेची चतुर्भुज आहे. गणेशमूर्ती नागपूर-वर्धा महामार्गाचे खोदकाम करताना सन १९२०-२१ मध्ये मिळाल्याची माहिती जुने जाणते सांगतात. मंदिराचा शतकी इतिहास येथील ग्रामस्थ आजही सांगतात. येथे दर महिण्याला चतुर्थी, गणेश जयंतीसह वर्षहीभर विविध उत्सवांचे आयोजन करण्यात येते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरात विद्युत रोशनाई, भगव्या पतकांनी सजविलेले आहे. उत्सवात रोज सकाळी- सायंकाळी आरती, गणेशस्तवन, अथर्वशीर्ष पठन, भजन या धार्मिक कार्यक्रमांसह बालकांचे विविध खेळ, स्पर्धा असे विविध उपक्रम चालणार आहे. अनंत चतुदर्शीलाला काल्याची कीर्तन होईल. उत्सवात गणेश भतांनी सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष डॉ. प्रमोद लाखे, सचिव सुनील कावलकर व सदस्यांनी केले आहे.