दोन वाहनं सोडून गोवंश तस्कर पसार

९ गोवंशाची सुटका

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
अल्लीपूर,
9 cattle rescued नजिकच्या सोनेगाव स्टेशन मार्गाने जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी पाठलाग केला. मात्र, पोलिसांना बघताच तस्करांनी दोन्ही वाहनं सोडून पसार झाले. वाहनांची पाहणी केली असता यात ९ जनावरे आढळून आली. ही कारवाई पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
 
 
 
जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती गस्तीवर असलेल्या अल्लीपूर पोलिसांना मिळाली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास पोलिसांनी दोन वाहनांचा पाठलाग केला असता त्यांनी जनावरे भरलेली गाडी व एक स्विफ्ट कार सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. पोलिसांनी बोलेरो गाडीची तपासणी केली असता ९ जनावरे आढळून आली. दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. सुझुकी स्विफ्ट गाडीचा मालक अल्लीपूर येथील रिजवान कुरेशी व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार संगीता हेलोंडे, पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर, जमादार अजय रिठे, अजय वानखेडे, पंकज कापसे, दिनेश खराबे आदींनी केली.