दुष्काळ सदृश स्थिती मान्य होणार का याकडे शेतकर्‍यांचे लक्ष

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
बुलढाणा,
buldhana जिल्ह्यात शेतजमीनीतील पिकांच्या वाढीसाठी घटलेला जमिनीतील ओलावा, पिकांचा हिरवटपणा आणि संभाव्य उत्पादन घट लक्षात घेता १७ सप्टेंबरच्या जिल्हा दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत दुष्काळसदृश स्थिती मान्य होणार का याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान कमी-अधिक पाऊस झाल्याने बहुतांश महसूल मंडळांतील सलग खंड थांबला; मात्र खरीप पिकांच्या निर्णायक अवस्थेत सर्व ९२ मंडळांनी दहा दिवसांपेक्षा अधिक खंड सोसला आहे १५ सप्टेंबरपर्यत जिल्ह्यात सरासरी मागील वर्षी पडलेला पाऊस ७६१.६ मिलिमीटरच्या तुलनेत यावर्षी ४७६.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. २८५ मिलीमीटर पाऊस कमी पडला आहे.
 
 
buldhana
 
सप्टेंबरच्या १२०.५ मिलिमीटर सरासरीपैकी पहिल्या पंधरवड्यात ३७.६ मिलिमीटर म्हणजे ३१.२ टक्केचा पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे वितरण कमालीचे असमान आहे. दीड महिना पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या उडीद मुगाच्या शेंगा, कपाशीची फुले-बोंडे आणि तुरीच्या वाढीला आधीच फटका बसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. काही भागात उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची प्राथमिक भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणीपुरवठा करणार्‍या मोठे प्रकल्प नळगंगा जलसाठा (४३.७६) टक्के, खडकपूर्णा (७०.२५), पेनटाकळी (४६.१३) तसेच लघूप्रकल्पात ८२.८० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.