नवी दिल्ली,
bumrahs sensational comeback दुखापती आणि तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर जसप्रीत बुमराहने दमदार पुनरागमन केले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये बुमराहने प्रभावी गोलंदाजी करत आपली लय कायम असल्याचे दाखवून दिले. दोन सामन्यांत त्याच्या नावावर दोन बळी असले, तरी त्याच्या गोलंदाजीतील अचूकता आणि प्रभावामुळे त्याला आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
आयसीसीच्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत बुमराहने तब्बल सात स्थानांची झेप घेत १० वे स्थान मिळवले आहे. त्याच्या खात्यात आता ६५० रेटिंग गुण आहेत. आगामी आशियाई खेळांच्या पार्श्वभूमीवर बुमराहला आणखी सामने खेळण्याची संधी मिळाल्यास त्याच्या क्रमवारीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
बुमराहसोबतच अर्शदीप सिंगच्या क्रमवारीतही मोठी सुधारणा झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांत पाच बळी घेतल्याचा त्याला फायदा झाला असून, त्याने ११ स्थानांची झेप घेत ६४२ रेटिंग गुणांसह १४ वे स्थान गाठले आहे. वरुण चक्रवर्तीनेही दोन स्थानांनी प्रगती करत ६७८ रेटिंग गुणांसह पाचवे स्थान मिळवले आहे. मात्र, दुखापतीमुळे पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर झाल्याने आणि आशियाई खेळांमध्ये सहभागी होता येणार नसल्याने त्याच्या क्रमवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.