काँग्रेसचे राजेंद्र शर्मा शप गटात

खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
वर्धा,
rajendra sharma गेल्या २७ वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेले राजेंद्र शर्मा यांनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे. बुधवार १६ रोजी मुंबई येथे शप गटाच्या कार्यालयात त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. ते काँग्रेसचे अनेक वर्ष शहर अध्यक्ष होते. राष्ट्रीय सेवादलाचेही ते अध्यक्ष होते. यावेळी शप गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, फौजीया खान उपस्थित होते.
 
 
rajendra sharma
 
वर्धा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसला गळती लागली आहे. देवळीचे माजी आमदार रणजित कांबळे यांच्या भोवतीच काँग्रेस फिरत असल्याने काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या कन्या व कांबळे यांच्या भगिनी चारूलता टोकस, शेखर शेंडे यांच्यासह अनेक जण नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत अमर काळे यांनी काँग्रेस सोडून शरद पवार गटात प्रवेश घेतला होता. आता शर्मा यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला.