सेलू,
court employees protest उच्च न्यायालयातील कर्मचार्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचार्यांनाही वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात बुधवार १६ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, सेलू येथील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला.

दुय्यम न्यायालयीन कर्मचार्यांना उच्च न्यायालयातील कर्मचार्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी न्यायालयीन कर्मचारी महासंघाने केली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी महासंघाच्या वतीने आंदोलनाचे टप्पे जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार सेलू येथील न्यायालयीन कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. दरम्यान, आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑटोबर रोजी नोंदविण्यात येणार असल्याचे महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. वेतनश्रेणीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधले जात असून, दुय्यम न्यायालयीन कर्मचार्यांच्या मागणीवर शासन कोणती भूमिका घेते, याकडे कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.