महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सहभाग
मानोरा,
Declare a dry drought तालुयात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, सरसगट कर्जमाफी करण्यात यावी,पिक विमा ताबडतोब देण्यात यावा आदी मागण्यासाठी मानोरा येथे तहसील कार्यालयावर शेतकर्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
पंचायत समिती जवळून हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघाला.तहसील कार्यालयावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अनंतकुमार पाटील होते. प्रस्तावित भाषण उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवी पवार यांनी केले.बाळासाहेब डेरे, मारोती पारधी, डॉ. विठ्ठलराव घाडगे, बाबूसिंग नाईक, फकीर बाबा उर्फ रमेश महाराज,डॉ.संजय रोठे, अरविंद पाटील इंगोले, अॅड. ज्ञायक पाटणी, राजू चौधरी, अनिल राठोड, माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी काही शेतकर्यांनी वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी करून सरकार विरोधी घोषणा दिल्या.
पावसाने खंड दिल्याने खरीप हंगाम धोयात आला असून शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत मिळाली पाहिजे.२ ऑटोबर पर्यंत मानोरा,कारंजा तालुयात कोरडा दुष्काळ जाहीर झाला नाही तर तहसील कार्यालयावर आमरण उपोषण सुरू करणार.असे मत सभेचे अध्यक्ष माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केले.
यवेळी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष रामनाथ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष काशीराम राठोड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल, माजी नगराध्यक्ष बरखा बेग, नंदा तायडे, डॉ. अशोक करसडे, सुनील जामदार, मधुसूदन राठोड, ठाकुरसिंग चव्हाण, संजय पवार, गोपाल शर्मा, बाळू राठोड, भुजंगराव राठोड, हुसेन भाई, दिलीप ठाकरे आदी शेकडो शेतकरी उपस्थित होते.