मारेगावात ई-पीक पाहणी प्रक्रियेत गोंधळ

शेतकऱ्यांच्या सातबारावर एकच पीक

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
मारेगाव,
e-pik-pahaniशेतातील पिकांची अचूक नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ई-पीक पाहणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करून नोंद केली असतानाही प्रणालीमध्ये अपेक्षित बदल नोंदविला जात नसल्याने महसूल शेतकरी संभ्रमात पडले आहेत. मिश्र पिकांच्या नोंदीचा प्रश्न गंभीर बनला असून दोन किंवा अधिक पिकांची नोंद केल्यानंतरही सातबारावर मात्र एकाच पिकाची नोंद होत असल्याची बाब समोर आली आहे.
 
e peek
 
 
शेतात प्रत्यक्ष उपस्थित राहून ई-पीक पाहणी करताना आणखी एक अडचण जाणवत आहेत. संबंधित शेताचा नकाशा आणि प्रत्यक्ष शेती क्षेत्र यामध्ये काही ठिकाणी तफावत आढळत असल्याने नोंदणीची प्रक्रिया अडखळत आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीची जबाबदारी असलेल्या महसूल सहाय्यकांना प्रत्यक्ष क्षेत्रात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही तांत्रिक समस्या वेळीच दूर न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. नाफेड, सीसीआय यासारख्या शासकीय खरेदी केंद्रांवर आधारभूत किंमतीनुसार शेतमाल विक्री करताना सातबारावरील पीक नोंदीला महत्त्व असते.
 
मिश्र पिकांची प्रत्यक्ष लागवड असतानाही सातबारावर एकाच पिकाची नोंद राहिल्यास संबंधित शेतकऱ्याला दुसऱ्या पिकाची विक्री करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.