फुटाळा तलावावर पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी ग्रीन व्हिजिलचा पुढाकार

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
नागपूर,
eco-friendly-ganesh-visarjanगेल्या १६ वर्षांची परंपरा कायम राखत ग्रीन व्हिजिल फाउंडेशनने यंदाही पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने फुटाळा तलावाच्या एअरफोर्स बाजूला हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
 
eco
गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि तलावांचे प्रदूषण रोखता यावे, या उद्देशाने ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कार्यकर्ते भाविकांच्या सेवेत उपस्थित राहणार आहेत. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन तसेच निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम या उपक्रमातून केले जाणार आहे.
 
१५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत फुटाळा तलाव परिसरात संस्थेचे स्वयंसेवक कार्यरत राहतील. भाविकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देऊन निर्माल्य संकलनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे गणेशोत्सवातील भक्तिभावासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.