सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा: जिल्हाधिकारी

आजपासून सेवा संकल्प अभियान

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
वर्धा,
district collector सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑटोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सर्व विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्या.
 
 
district collector
 
जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, अनिल गावित, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले, सहाय्यक आयुत अंकेश केदार, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर खडतकर आदी उपस्थित होते.
 
 
अभियानाच्या कालावधीत सर्व तालुयांच्या ठिकाणी सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. शिबिरांमध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देतानाच प्रलंबित दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करावे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे शय तितया जलदगतीने निराकरण करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले. अभियान केवळ शासकीय सेवा व योजनांपुरते मर्यादित न ठेवता स्वच्छता, सामाजिक बांधिलकी, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आणि रस्ते सुरक्षा यासारख्या विषयांवरही विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
 
 
नागरिकांमध्ये प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता उपक्रम आयोजित करून त्यांना आवश्यक डिजिटल व्यवहारांची माहिती द्यावी. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पृष्ठभूमीवर नागरिकांना सायबर फसवणुकीपासून खबरदारीची माहिती तसेच रस्ते सुरक्षा अभियानालाही विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावभेटी, सेवा शिबिरे, विभागनिहाय उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत. स्थानिक उत्पादने, उद्योजक आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल उपक्रम प्रभावीपणे राबवावा. प्रत्येक विभागाने अभियानांतर्गत राबविलेल्या उपक्रमांची माहिती, लाभार्थ्यांचा तपशील आणि योजनांच्या लाभाची आकडेवारी नियमितपणे संकलित करावी. कामाच्या प्रगतीचा डेटा अद्ययावत ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.