विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध!

वाहतुकीसाठी ठरतोय अडचणीचा

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
वरुड, 
electricity poles dangerतालुक्यातील एकल विहीर ते करवार मार्गावरील जिचकार रोहित्राजवळील इलेक्ट्रिक खांब रस्त्याच्या मधोमध असल्याने तो वाहतूकीस अडचणीचा ठरत आहे. हा खांब काढण्यासाठी अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांनी महावितरणला लेखी निवेदन दिले आहे.

ele 
 
जामठी, एकल विहीर, लिंगा, करवार येथील शेतकऱ्यांची शेती जास्तीत जास्त याच रस्त्यावर आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता हाच मार्ग असल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. रात्रीच्या वेळी हा खांब वाहनचालकांना दिसत नसल्याने या खांबावर दुचाकी, ऑटोरिक्षा, बैलगाडी, बस, धडकण्याची भीती आहे. वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या या खांबामुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून हा खांब तत्काळ हटविण्याची मागणी सातत्याने होत आहे. तरीसुद्धा महावितरण विभाग कुंभकर्णी झोपेत आहे.
 
 
सचिन ढोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी महावितरण कार्यालयात निवेदन दिले व हा खांब तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे. या खांबामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारे नुकसान झाल्यास याला महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी दोषी राहतील, असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.