समुद्रपूर,
Nimbha-Wagheda road निंभा ते वाघेडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून अपघाताची शयता निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर कवठाचे सरपंच प्रवीण जायदेव यांनी संबंधित गावातील नागरिकांच्या वतीने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.
रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निंभा-वाघेडा हा रस्ता समुद्रपूर-नंदोरी मार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. निवेदन देतेवेळी ग्रापं सदस्य गजानन धुर्वे, पांडुरंग लेडे, मंगेश केराम, रुपेश केराम, लालाजी धुर्वे, मंगेश भोयर, पांडुरंग येरचे, अशोक नक्षिणे, भोला कुमरे, विकास कुमरे, सुजल केराम आदी उपस्थित होते.