एक व दीड दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात पर्यावरपूरक विसर्जन

८९ कृत्रिम तलावात २ हजार ८० श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
नागपूर,
ganpati-visarjan-2026शहरात गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाचे आगमन झाल्यानंतर श्रीगणेश मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, याकरिता नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. एक व दीड दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे विसर्जनासाठी मनपाद्वारे तयार करण्यात आलेल्या ८९ कृत्रिम तलावांमध्ये २ हजार ७९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यात २ हजार १० मातीच्या व ६९ पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या कृत्रिम तलावांची माहिती मिळविण्यासाठी मनपाने दिलेल्या क्यूआर आणि संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहेत.

visarjn 
नागपूर महानगरपालिकेने शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात एकूण ४१९ कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती टप्याटप्याने केली जाणार आहे. यातील काही विसर्जन कुंडांचे लोकार्पण महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते फुटाळा तलाव परिसरात करण्यात आले आहे. शहरात गणेशोत्सवाचे आगमन झाल्यानंतर गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी मनपाचे शहरातील विविध ठिकाणी ४१९ वर कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मोठ्या आकाराच्या गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज भागातील कच्छी विसा व कोराडी येथे मोठे तलाव बांधले आहेत.
मनपाच्या दहाही झोन स्तरावर नागरिकांनी आपल्या जवळील मनपाच्या कृत्रिम तलावावर श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन केले. एक व दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी लक्ष्मीनगर झोनमध्ये १० कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, यात पहिल्या व दीड दिवसात १ हजार ७७ मातीच्या व २३ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. तर धरमपेठ झोन अंतर्गत ३७ तलाव असून, या कृत्रिम तलावात ६६७ मातीच्या व २४ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. हनुमाननगर झोन येथे २ कृत्रिम टाकावे असून, कृत्रिम तलावात १० मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. धंतोली झोन अंतर्गत ३ कृत्रिम तलाव असून, कृत्रिम तलावात ४८ मातीच्या मूर्तींचे आणि ५ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत असलेल्या २ कृत्रिम तलावांमध्ये १९६ मातीच्या मूर्तींचे आणि १४ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. गांधीबाग झोनमध्ये २२ कृत्रिम तलाव असून, या कृत्रिम तलावांमध्ये ८ मातीच्या तर ३ पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. सतरंजीपुरा येथे १ कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. तर मंगळवारी झोनमध्ये १२ कृत्रिम तलावात ४ मातीच्या मूर्तींचे विसर्जन झाले आहे.