पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

२५ वर्षीय तरुणाविरुद्ध वाठोडा पोलिसांत गुन्हा

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
sexual assault पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका २५ वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी अमीर अख्तर हुसेन (२५, रा. गरीब नवाज चौक, मूळ अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

married woman alleges sexual assault after threats to kill husband and children in nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३१ वर्षीय विवाहित महिलेची २०२५ मध्ये व्हिडिओ एडिटिंगच्या कामानिमित्त आरोपी अमीर हुसेन याच्याशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरोपी महिलेच्या घरी ये-जा करू लागला. त्यानंतर आरोपीने महिलेच्या पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीचा धाक दाखवून त्याने महिलेला तिच्या घरात तसेच खरबी परिसरातील साईबाबानगर येथील ओयो हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२५ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला. आरोपी वारंवार रात्री-अपरात्री महिलेला फोन करीत होता. तसेच तिचा पाठलागही करीत असल्याने महिला त्रस्त झाली होती.
त्रस्त होऊन पोलिसात तक्रार
अखेर महिलेने वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील बलात्कार, लैंगिक अत्याचार, धमकी तसेच पाठलाग करण्यासंदर्भातील संबंधित कलमांन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलिस करीत असून, आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.