ग्रापंनिहाय सरपंच पदाच्या आरक्षणासाठी २३ रोजी तालुकास्तरावर बैठक

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
वर्धा,
gram panchayat मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सन २०२५-२०३० या कालावधीकरिता नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखून ठेवण्याची कारवाई करण्यासाठी तालुकास्तरावर २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण निश्चितीबाबत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम २-अ च्या पोट नियम (१) व (२) आणि याविषयी ग्राम विकास विभाग, मुंबई यांचेकडील शासन अधिसूचना असाधारण क्र. ४३८ दिनांक १२ ऑगस्ट. २०२६ अन्वये जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये बदल न करता ५० टकेच्या मर्यादेत नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गाकरिता शासन राजपत्रातील अनुसूची-२ मध्ये नमूद केल्यानुसार सन २०२५-२०३० या कालावधीकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन दिले आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा ग्राम पंचायत निवडणूक प्रभारी रमा जोशी यांनी कळविले आहे.