वाशीम-अमरावती बसफेरीचे नियोजन कोलमडले

प्रवाशांची हेळसांड

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
आगार व्यवस्थापकांना निवेदन
 
 
वाशीम,
Washim-Amravati bus service कारंजा आगाराची वाशीम-अमरावती बसफेरी नियमीत सुरु राहत नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. सदर बसफेरी वेळेनुसार नियमीत सुरु ठेवावी, अशी मागणी प्रवाशांनी कारंजा आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कारंजा आगाराची वाशीम-अमरावती ही बस वाशीम येथून संध्याकाळी ७.३० वाजता निघते.
 
 
प्रवाशांची हेळसांड
 
या मार्गावरील प्रवाशांना घरी जाण्यासाठी ही शेवटची बस असल्यामुळे नोकरवर्गासह या मार्गावर असलेल्या ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यात महिला प्रवाशांची संख्या अधिक असते. मात्र, ही बसफेरी नियमीत राहत नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी ऐनवेळी ही बस रद्द करण्यात येते. कधी कधी तर साधी बस सोडून शिवाई बस सोडण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त तिकीटाचा भुर्दड पडतो. कधी कधी ही बस वाशीमला सोडण्याआधी शालेय फेरीला दिल्या जाते. त्यामुळे महिन्यातून अनेकदा ही बस उशिरा सुटते. या सर्व बाबीमुळे प्रवाशी त्रस्त झााले असून, याबाबत आगार व्यवस्थापकांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात. तरी याबाबत योग्य ती दखल घेऊन कारंजा आगाराची वाशीम - अमरावती बसफेरी वेळेनुसार नियमीत सुरु ठेवावी, अशी मागणी प्रवाशांनी विभागीय नियंत्रक व कारंजा आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.