उत्तर प्रदेशात 15,012 शिक्षक पदांची भरती!

आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
Teacher post in Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील माध्यमिक आणि मूलभूत शिक्षण विभागांतर्गत सहायक शिक्षकांपासून प्रवक्त्यांपर्यंत एकूण 15,012 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी बुधवार, 16 सप्टेंबर 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत नोंदणी आणि परीक्षा शुल्क जमा करता येणार आहे. या भरतीसाठी दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून, दोन्ही पदांसाठी अर्ज प्रक्रिया वेगवेगळी आहे.या भरतीमध्ये संलग्न प्राथमिक विभागातील 897 सहायक शिक्षक, शहरी भागातील 11,508 सहायक शिक्षक आणि 2,607 प्रवक्ता अर्थात पीजीटी पदांचा समावेश आहे. त्यामुळे सहायक शिक्षकांच्या एकूण 12,405 पदांसाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रवक्ता पदांसाठीची अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. या भरतीमध्ये एकदाच नोंदणी करण्याची सुविधा लागू करण्यात आली आहे.
 
 
 
Teacher post in Uttar Pradesh
अर्जाची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 असून, त्याच दिवशी परीक्षा शुल्क भरण्याची मुदतही संपणार आहे. अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2026 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक परीक्षा 3 आणि 4 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. सामान्य, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1,000 रुपये, अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये, तर दिव्यांग उमेदवारांसाठी 300 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयचा वापर करता येणार आहे. वयाची गणना 1 जुलै 2026 रोजीच्या आधारावर केली जाणार असून, उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. वयोमर्यादेतील सवलत उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक परीक्षा नियम आणि जाहिरात क्रमांक 05/2026 मधील नियमानुसार लागू होणार आहे.