मैनपुरी,
A mother-in-law falls in love with her son-in-law उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात सासू आणि जावयाच्या नात्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे ३५ वर्षांच्या पाच मुलांच्या आईचे तिच्याच २० वर्षीय जावयासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून दोघांमधील जवळीक वाढल्याचे सांगितले जात असून, आता दोघेही एकमेकांसोबत राहण्यावर ठाम असल्याने कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला आहे.ही महिला घिरोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहते. तिच्या पतीचे सुमारे वर्षभरापूर्वी निधन झाले असून, त्यानंतर ती आपल्या पाच मुलांसोबत राहत होती. दरम्यान, तिचे आणि जावयाचे संबंध निर्माण झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले.
'
नुकतेच महिला आणि तिचा जावई मैनपुरी येथे एका नातेवाईकाच्या घरी आले असताना त्यांच्या नात्याची माहिती मुलांना मिळाली. त्यानंतर घरात वाद सुरू झाला. मुलांनी या संबंधाला विरोध करत दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला आणि तिचा जावई आपल्या निर्णयावर ठाम राहिले.प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर दोघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पोलिसांनी तरुणाशी त्याच्यासोबत असलेल्या महिलेबाबत विचारणा केली असता, ती आपली सासू असल्याचे त्याने स्पष्ट केले. त्याला सासूसोबत लग्न करून राहायचे आहे का, असे विचारले असता त्याने होकार दिला. पत्नीला सोबत राहायचे असेल तर ती राहू शकते, अन्यथा ती स्वतंत्र जाऊ शकते, असेही त्याने पोलिसांसमोर सांगितल्याचे समोर आले.
महिलेच्या पाच मुलांची जबाबदारी कशी सांभाळणार, असा प्रश्नही पोलिसांनी तरुणाला केला. त्यावर तिच्यासोबत राहण्याची इच्छा असलेली मुले त्यांच्यासोबत राहू शकतात आणि लहान मुलांची काळजी घेण्यासही आपण तयार असल्याचे त्याने सांगितले. दुसरीकडे, महिलेनेही तरुणासोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि सध्या दोन्ही बाजूंना घरी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात लेखी तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणी कोणताही अंतिम निष्कर्ष अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही.