आसोला शेत शिवारामधील उघड्या विद्युत डीपीमुळे अपघाताची शयता

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
मानोरा,
electrical DP तालुयातील आसोला खुर्द गावातील शेत शिवारातील असलेल्या विद्युत डीपीची असुरक्षित अवस्था शेतकरी तसेच शेतात ये-जा करणार्‍या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. डीपी बॉसमध्ये उघड्या तारा व उघडे फ्यूज दिसून येत असल्याने कोणत्याही वेळी गंभीर दुर्घटना घडण्याची शयता व्यक्त केली जात आहे.
 
 

electrical DP 
शेतीच्या कामासाठी शेतकरी शेतमजूर तसेच जनावरांची या परिसरात सतत ये-जा असते.अशा परिस्थितीत उघड्या विद्युत तारा व फ्यूजमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतःपावसाळ्यात जमीन ओली असल्याने विद्युत दुर्घटनेचा धोका आणखी वाढण्याची शयता आहे. डीपीच्या आजूबाजूला पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटना घडण्यापूर्वीच सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शेतमालकाकडून होत आहे. संबंधित विभागाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी आणि आवश्यक विद्युत सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍या कडून केली जात आहे.