भटकळमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव

मशिदीच्या काचा फुटल्याचा आरोप

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
भटकळ
bhatkal ganesh visarjan कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ शहरात बुधवारी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मिरवणूक एका मशिदीजवळून जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी मशिदीच्या दिशेने दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत मशिदीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दगडफेकीसाठी जबाबदार व्यक्तींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

bhatkal ganesh visarjan procession: mosque stone pelting allegation sparks tension in karnataka’s uttara kannada 
तालंद येथून सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक इस्माईल सुन्नी जामिया मशिदी तसेच तिच्या परिसरातील ताज-उस-सुन्नत अरबी मदरशाजवळून जात असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मिरवणूक मशिदीजवळ पोहोचल्यानंतर वादाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर मशिद आणि मदरशाच्या इमारतीवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला.या प्रकरणी भटकल टाउन पोलिस ठाण्यात ६७ वर्षीय अब्दुल अलीम आणि शाहुल अमीन गवाई यांनी तक्रार दाखल केली आहे. मशिद आणि मदरशाच्या इमारतीवर दगडफेक करण्यात आल्याने खिडक्यांच्या काचा फुटल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर मुस्लिम समाजातील नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर एकत्र येत निषेध नोंदवला. दगडफेकीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.घटनेची माहिती मिळताच उत्तर कन्नड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तातडीने भटकळ येथे दाखल झाले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून संबंधितांवर त्वरित कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी तक्रार आधीच दाखल झाली असून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तेथून हटावे आणि पोलिसांना तपास करू द्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले.
पोलिसांनी कारवाईचे आश्वासन bhatkal ganesh visarjan दिल्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर जमलेली गर्दी हळूहळू तेथून निघून गेली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भटकळमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून दगडफेकीच्या घटनेचा तपास करून संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, अशाच प्रकारच्या तणावपूर्ण घटनेत अलीकडेच छत्तीसगडमधील बिलासपूर येथे सोशल मीडियावरील एका टिप्पणीवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत ५०हून अधिक जण जखमी झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला होता.