आलिशान कारमधून 10 धारदार तलवारी जप्त

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
धुळे
dhule sword seizure दोंडाईचा येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आलिशान कारमधून तब्बल दहा धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. सुरतहून दोंडाईचाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर तलवारी आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित कार अडवली. वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दहा धारदार तलवारी आढळून आल्या.
 

jjj
 
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित आलिशान कारचा पाठलाग करून ती अडवली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये तलवारींचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तलवारींसह वाहन ताब्यात घेतले.
या प्रकरणातील मुख्य संशयित हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दहा तलवारी आणि आलिशान कार असा पाच लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या तलवारी नेमक्या dhule sword seizure कोणत्या उद्देशाने सुरतहून दोंडाईचाला आणल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तलवारींची विक्री करण्याच्या उद्देशाने हा शस्त्रसाठा आणण्यात आला होता का, अथवा त्यामागे दरोडा किंवा अन्य गुन्ह्याचा कट होता का, या विविध शक्यतांच्या दिशेने तपास केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.