मुंबई,
farmers welfareमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या इतिहासासोबतच दुष्काळ, शेतकरी, कर्जमुक्ती, पाणीप्रश्न, नदीजोड प्रकल्प आणि छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याबाबत सरकारची भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्वांकरिता महत्त्वाचा दिवस आहे. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, मात्र गुलामगिरीत होता तो झगडत संघर्ष करत होता. त्या संघर्षातून 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे 13 महिन्यांनंतर मराठवाड्याला मुक्ती मिळाली. भारताचा तिरंगा झेंडा मराठवाड्यात देखील फडकलेला पाहायला मिळाला. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी बलिदान दिले. त्यावेळी मराठी बोलण्यासाठी बंदी होती. त्या काळात अत्याचाराची परिस्थिती पाहायला मिळत होती, सण साजरे करता येत नव्हते. अशा स्थितीतून मराठवाड्याला बाहेर काढण्याचे काम स्वातंत्र्य सेनानींनी केले.
सर्वात जास्त दुष्काळाचे संकट मराठवाड्यात आहे. सातत्याने दुष्काळाचे चित्र घोंगावत आहे. हे वर्ष देखील दुष्काळाचे वर्ष आहे. सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की, आपले सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करू. आम्ही आतापासून सर्व तयारी सुरू केलेली आहे. 5 ऑक्टोबरनंतरचे सर्व पंचनामे करू. NDRF ची मदत तर मिळेल, त्याच्या अगोदर राज्य सरकार आपली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.