तहसीलदाराचा कारनामा एक कोटी आणि एक एकर जमिनीची मागणी

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
धारवाड
karnataka lokayukta कर्नाटकातील कथित सर्वात मोठ्या लाचखोरीच्या कारवायांपैकी एक मानल्या जात असलेल्या प्रकरणात लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धारवाडच्या तहसीलदाराला ५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सच्चिदानंद कुचनूर असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव असून, बुधवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास कर्नाटक महाविद्यालयासमोरील परिसरात ही कारवाई करण्यात आली.
 

karnataka lokayukta catches dharwad tahsildar taking rs 50 lakh bribe 
लोकायुक्तांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धारवाडपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर तसेच पुणे-बेंगळुरू महामार्गालगत असलेल्या येरिकोप्पा गावातील ३३ एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी तहसीलदार सच्चिदानंद यांनी कथितपणे एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या दोन हप्त्यांत देण्याची मागणी करण्यात आली होती. याशिवाय एका एकर जमिनीचीही मागणी करण्यात आल्याचे लोकायुक्तांच्या सूत्रांनी सांगितले.
या मागणीविरोधात संबंधित जमीनमालकाने लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारदाराची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. तक्रारीची दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यांच्या सूचनेनुसार तक्रारदाराला ५० लाख रुपयांची लाचेची रक्कम घेऊन धारवाड येथील KCD परिसरात जाण्यास सांगण्यात आले. बुधवारी रात्री सुमारे दहा वाजता कर्नाटक महाविद्यालयासमोर जमीनमालकाकडून ही रक्कम स्वीकारताना तहसीलदार सच्चिदानंद कुचनूर यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
कारवाईदरम्यान लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, तहसीलदाराविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरिकोप्पा येथील ३३ एकर जमिनीशी संबंधित कागदपत्रे, मालकी हक्कात कथित फेरफार करण्यासाठी करण्यात आलेली लाचेची मागणी तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास लोकायुक्तांकडून सुरू आहे. प्रकरणाच्या पुढील तपासाला वेग देण्यात आला आहे.
दरम्यान, राजस्थानातील भरतपूर येथेही अलीकडेच लाचखोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली होती. तेथे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या एका सहाय्यक अभियंत्याच्या घरावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकला होता. या कारवाईत घरातून ४३.३८ लाख रुपयांची रोकड तसेच तब्बल २० किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या होत्या.
भरतपूर जिल्ह्यातील भुसावर पंचायत karnataka lokayukta समितीत संबंधित सहाय्यक अभियंत्याला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक अभियंता लाचेची मागणी करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. कंत्राटदाराच्या तक्रारीनंतर ACBने ही कारवाई केली. भरतपूर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्याची माहिती ACBचे महासंचालक गोविंद गुप्ता यांनी दिली होती. त्यांच्या माहितीनुसार, कारवाईनंतर सहाय्यक अभियंत्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोकड आणि २० किलो चांदीच्या विटा आढळून आल्या होत्या.