वाढदिवशी पुतिनांचा मोदींना संदेश; ‘तुमचा दर्जा खूप मोठा’

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Putin's message to Modi on his birthday पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला. गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी दिलेल्या या संदेशात पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत जागतिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले. तसेच भारत आणि रशियामधील सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी मोदींचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.पुतिन यांनी आपल्या संदेशात म्हटले की, भारतीय नागरिकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना मोठा आदर असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांचा प्रभाव आहे. भारत आणि रशिया यांच्यातील सामरिक संबंध दृढ करण्यासाठी मोदींनी दिलेले योगदान शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
 

32546 
 
 
गेल्या आठवड्यात झालेल्या नवी दिल्ली दौऱ्याचा उल्लेख करत पुतिन यांनी रशियन शिष्टमंडळाला मिळालेल्या स्वागत आणि पाहुणचाराबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. नवी दिल्लीतील चर्चेबाबत पुतिन म्हणाले की, मोदींसोबत झालेली चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरली आणि त्यातून सकारात्मक परिणाम मिळाले. मोदींसोबत चर्चा करणे नेहमीच आनंददायी असल्याचे सांगत या चर्चेतून त्यांची राजकीय दूरदृष्टी आणि शहाणपण पुन्हा एकदा दिसून आल्याचे पुतिन यांनी नमूद केले. तसेच रशिया आपल्या मित्र देशांना पाठिंबा देणे यापुढेही सुरूच ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.