‘त्या’ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनमंत्र्यांची हिरवी झेंडी

वनविभागाचे युद्ध पातळीवर प्रयत्न

    दिनांक :17-Sep-2026
Total Views |
समुद्रपूर, 
Search for the tigress from Pavangaon पवनगाव येथील विशाल मून यांच्यावर हल्ला करून वाघिणीने गंभीर जखमी केले. तर ९ रोजी पीक सर्वेक्षणासाठी गेलेल्या कोतवाल कैलास बहादूरे व सुधीर साबळे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आमदार समीर कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून तातडीने या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली होती. वनमंत्री नाईक यांनी आ. कुणावार यांच्या मागणीला गांभीर्याने घेत या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्याची परवानगी दिली असून वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे.
 
 
 

kjuiy 
 
पवनगाव (करूळ) परिसरात वाघिणीने दहशत निर्माण केली असून अनेक जनावरांना ठार केले आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांना शेतात जावे लागते. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यांची शयता बळावली आहे. सालगडी विशाल मून यांच्यावर वाघिणीने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तसेच पीक सर्वेक्षणासाठी गेलेल्या कोतवालासह अन्य एकावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक हरीश सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील पथक युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून वाघिणीच्या जाण्याच्या मार्गावर शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच रात्रंदिवस गस्त घालून शेतकरी व शेतमजुरांमध्ये जनजागृती करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गिरड परिसरातून तीन वाघांना सुद्धा जेरबंद करण्यासाठी आ. कुणावार यांनी प्रयत्न केले होते. आता या वाघिणीला पकडण्याची परवानगी मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसरक्षक हरीश सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे यांच्या नेतृत्वात मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे, प्रणव जोशी, डॉ. मेघराज भलावी आदी पवनगाव परिसरात ठाण मांडून बसले आहेत.