अमृतसरमध्ये एएसआयची गोळ्या झाडून हत्या!

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
अमृतसर,
ASI killed in Amritsar अमृतसरमध्ये कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या पंजाब पोलिसांच्या एएसआय हरजीत सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. हरजीत सिंह हे गेट हकीमा पोलिस ठाण्यात कार्यरत होते आणि त्यांच्यावर गस्तीची जबाबदारी होती. ड्युटी संपल्यानंतर घरी जात असताना भगतांवाला धान्य बाजाराच्या गेट क्रमांक दोनबाहेर त्यांच्या मानेवर गोळी झाडण्यात आली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
 

panhajab 
या घटनेनंतर पंजाब सरकारने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एएसआय हरजीत सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला अभिवादन केले. सरकारकडून त्यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेकडून कुटुंबाला आणखी १ कोटी रुपयांचा विमा मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री मान यांनी सांगितले. शहीद पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत सरकार ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी पंजाब सरकारवर टीका केली आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. आतापर्यंत तीन एएसआयची हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला. अमृतसरमध्ये मागील रात्री झालेल्या दोन हत्यांमध्ये एएसआय हरजीत सिंह यांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले. ड्युटीवर असलेले पोलिस अधिकारीच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.