सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना

शशी शेखर वेम्पती नवे अध्यक्ष

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
मुंबई
censor board reconstituted केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) पुनर्रचना केली असून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 16 सप्टेंबर रोजी नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. नव्या मंडळात चित्रपट, दूरदर्शन, संगीत आणि कला क्षेत्रातील 18 मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. हे मंडळ पुढील तीन वर्षे कार्यरत राहणार असून, शशी शेखर वेम्पती यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
censor board reconstituted shashi shekhar vempathi appointed new cbfc chairman
 
नव्या मंडळातील सदस्यांमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी, अभिनेत्री प्रिती झिंटा आणि पल्लवी जोशी तसेच अभिनेता सुनील शेट्टी यांचा समावेश आहे. याशिवाय दिग्दर्शक प्रियदर्शन, दूरदर्शन अभिनेत्री रुपाली गांगुली, अभिनेते मनोज जोशी आणि प्रसेनजित चॅटर्जी यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गायक हंसराज हंस आणि संगीतकार रिकी केज यांनाही मंडळात स्थान देण्यात आले आहे.
विनोद अनुपम, अभिषेक जैन, सुप्रिया यारलागड्डा, यतींद्र मिश्रा, नीला माधव पांडा, निशिगंधा वाड, वामन केंद्रे आणि रमेश पतंगे यांचाही नव्या मंडळात समावेश आहे. नियुक्त करण्यात आलेले हे सर्व सदस्य तत्काळ आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारून कामकाज सुरू करणार आहेत.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ कार्यरत असते. देशात कोणत्याही चित्रपटाचे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शन करण्यापूर्वी मंडळाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मंडळाचे मुख्यालय मुंबईत असून, देशभरात त्याची नऊ प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत.दरम्यान, ‘कांतारा’ या चित्रपटाने तब्बल नऊ पुरस्कार पटकावल्याची बातमीही चर्चेत आहे.