लाचखोर पोलिस हवालदारांना पोलिस कोठडी

दुसरा हवालदार २० हजार घेऊन फरार

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
nagpur bribery case एका अदखलपात्र गुन्ह्यात सेटलमेंट करुन देण्याच्या नावावर २० हजार रुपयांची लाच घेताना जरीपटका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार सचिन तायडे याला एसीबीने अटक केली तर दुसरा हवालदार मनिष उत्तम मेश्राम हा लाचेची रक्कम घेऊन फरार झाला. हवालदार तायडेला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली तर मनिषचा शोध पोलिस घेत आहेत.
 

nia human trafficking case: 9 convicted, including 8 bangladeshi nationals, get life imprisonment 
तक्रारदार युवकाचा काकासोबत कौटुंबिक वाद सुरु होता. जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. कौटुंबिक स्वरुपाची तक्रार असल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याने ठाणेदाराची भेट घेतली. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असा तक्रारदाराचा आरोप आहे. त्यामुळे हवालदार सचिन तायडे आणि मनिष मेश्राम यांनी हे प्रकरण हाताळले. दोघांनी ४० हजारांच्या लाचेची मागितली. वरिष्ठांपर्यंत पैसे पुरविल्यास प्रकरणाचा निपटारा होईल, असे सांगून दोन्ही हवालदारांनी २० हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली. जरीपटका पोलिस ठाण्यात तायडे आणि मेश्राम यांनी लाच घेतली. मात्र, मेश्राम हा लाचेची रक्कम घेऊन एसीबीला गुंगारा देऊन पळून गेला. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.