अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime मेट्रिमोनी बेवसाईटवरून ओळख झालेल्या घटस्फोटित महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून राजेश प्रेमचंद गोस्वामी (४४, रा. बालपांडे लेआउट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश हा मूळचा हिमाचल प्रदेशातील असून एका कंपनीत स्वयंपाकी म्हणून काम करतो. पीडित महिलेचा २००८ मध्ये विवाह झाला होता. तिला एक मुलगी आहे. पतीसोबतच्या कौटुंबिक वादातून २०११ मध्ये तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती आई-वडिलांसोबत राहत होती. पुन्हा विवाह करण्याच्या उद्देशाने महिलेने २०२० मध्ये ‘शादी डॉट कॉम’ या मेट्रिमोनी वेबसाईटवर नोंदणी केली होती. २०२२ मध्ये राजेश याने या वेबसाईटच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. दोघांमध्ये नियमित संवाद nagpur crime सुरू झाला. त्यातून मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. राजेशने महिलेला विवाह करण्याचे आश्वासन देत वेळोवेळी तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी राजेशने अचानक तिच्याशी संपर्क तोडला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली असता त्याने विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजेशला अटक केली.