एमडी तस्काराने थाटला देहव्यापाराचा अड्डा

देहव्यापार करणारी तरुणी ताब्यात : दलालाला ३.६१ ग्रॅम एमडीसह अटक

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
नागपूर,
nagpur md drug case महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करणे तसेच ग्राहकांना एमडी विक्री करण्याच्या आरोपावरून सामाजिक सुरक्षा विभाग आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अजनी परिसरात एका २३ वर्षीय तरुणाविरुद्ध कारवाई केली. मंथन गोपाल थोटे (२३, रा. चंद्रमणीनगर, गल्ली क्रमांक ७, अजनी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३.६१० ग्रॅम एमडी पावडर, रोख रक्कम, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 

nagpur md drug case alleged sex racket busted in ajni, 23-year-old arrested with 3.61 gm md 
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलांना व मुलींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख दर्शन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर सार्वजनिक ग्रंथालयासमोरील रस्त्यावर दोन पंच आणि बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कारवाई केली असता आरोपीने एका महिलेला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने आरोपीला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे ग्राहकाला विक्री करण्यासाठी ठेवलेली ३.६१० ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी एमडी पावडरची किंमत ३६ हजार १०० रुपये, १ हजार ५०० रुपये रोख, ६० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा दुचाकी आणि २१ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात कुणाल यशवंत येळेकर (रा. दुर्गानगर, नागपूर) हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास अजनी पोलिस करीत आहेत.