हैदराबाद
bangladesh सात वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या मानव तस्करीच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIAला मोठे यश मिळाले आहे. हैदराबाद येथील विशेष NIA न्यायालयाने मानव तस्करीच्या जाळ्याशी संबंधित नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषींमध्ये आठ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी हा निकाल दिला. तसेच सर्व दोषींवर एकूण १.३७ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.
हे प्रकरण २०१९ मधील आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एका मानव तस्करीच्या टोळीने बांगलादेशातील महिलांना भारतात चांगली नोकरी आणि अधिक वेतनाचे आमिष दाखवून आणले. भारतात आल्यानंतर या महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध देहव्यापारात ढकलले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाची सुरुवात सप्टेंबर २०१९ मध्ये झाली. तेलंगणा पोलिसांनी हैदराबादमधील पहाडी शरीफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान जलपल्ली गावातील एका वेश्यालयातून तीन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली. याशिवाय हैदराबादमधील बालापूर येथील महिमूद कॉलनीतील एका घरातून आणखी एका महिलेची सुटका करण्यात आली.
तेलंगणा पोलिसांच्या कारवाईनंतर NIAने १२ ऑक्टोबर २०१९ रोजी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. त्यानंतर प्रकरणाची नव्याने नोंद करून RC-03/2019/NIA/HYD हा क्रमांक देण्यात आला. तपास पुढे नेताना NIAला आरोपींचा मानव तस्करीच्या नेटवर्कशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२० रोजी संबंधित आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
NIAच्या तपासादरम्य