प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन

नायरा कामगारांचा व्यवस्थापनाला कामबंदचा इशारा

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
पुलगाव,
nyara energy workers गेल्या अनेक दिवसांपासून नायरा एनर्जी लिमिटेड निमगाव (सबाने) येथील कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. नायरा कंपनीमध्ये कार्यरत कामगारांच्या वेतन, कामाचे तास, ओव्हरटाईम, वैद्यकीय भत्त्यासह विविध प्रलंबित मागण्यांवर अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याने कामगारांनी २८ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कंपनी व्यवस्थापनला दिला आहे.
 


vzbfg m  
कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आजूबाजूच्या गावातील लोक तिथे काम करण्यासाठी जात असतात. महागाईच्या काळात सुद्धा कामगार कायद्यानुसार हकाचे वेतन मिळत नसल्याने कामगारांनी आता कामबंद संपचा निर्णय घेतला आहे. कंपनीमध्ये विविध एजन्सीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा पुरवली जाते. चेकमेट, एच. के. सी., वेन्चर विहार, निनाद, राम नर्सरी, सेयुरीस एजन्सीतील कामगार आपली सेवा देत असतात. मात्र, यापैकी कुठल्याच एजन्सीतील कामगारांना न्याय मिळत नसल्याने कामगारांनी एकत्रित येऊन प्रलंबित मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधू शांततामय व कायदेशीर पद्धतीने कामबंद संप करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पूर्वसूचनेत नमूद करण्यात आले आहे. कामगारांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घेऊन त्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कंपनीकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कामगारांचा संप सुरूच राहील, असा इशाराही कामगारांनी दिला आहे. कामगारांच्या या भूमिकेमुळे २८ सप्टेंबरपासून नायरा कंपनीतील कामकाजावर परिणाम होण्याची शयता असून, कंपनी व्यवस्थापन आता या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.