१७ ऑक्टोबर; या ५ राशींवर सूर्याची कृपा

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
The Sun's grace upon 5 zodiac signs ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य या राशीत १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहणार असून, या काळात त्याच्या गोचराचा काही राशींवर विशेष प्रभाव पडणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. वृश्चिक, धनु, कर्क, मेष आणि तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो.
 
 
The Sun
 
 
मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर सहाव्या भावात होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. स्पर्धकांवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि क्षमता वाढण्याचे संकेत आहेत.
कर्क राशीसाठी सूर्याचा तिसऱ्या भावातील प्रवेश धैर्य आणि निर्णयक्षमता वाढवणारा ठरू शकतो. व्यवसायाशी संबंधित कामे तसेच छोट्या प्रवासातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये येणारे अडथळे दूर होऊन कामे मार्गी लागण्याचे संकेत आहेत.
तूळ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे गोचर बाराव्या भावात होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण बाबींवरील खर्च वाढू शकतो. मात्र, परदेशी कंपन्यांशी संबंधित व्यवसाय, आयात-निर्यात क्षेत्र आणि परदेश प्रवासाची इच्छा असणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो.
वृश्चिक राशीसाठी सूर्याचे गोचर अकराव्या म्हणजेच लाभ भावात होणार असल्याने हा काळ विशेष फलदायी मानला जात आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आणि पदोन्नतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होण्यासोबतच सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ होण्याची शक्यता आहे.
धनु राशीसाठी सूर्याचा प्रवेश दहाव्या म्हणजेच कर्म भावात होत आहे. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी तसेच वडिलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी धनु राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.