वर्धा,
wardha dams वर्धा जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जेमतेम दोन-तीन दिवसच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या-विहिरी आणि धरणांची स्थिती बिकट आहे. दरवर्षी जिल्ह्यातील धरणं तुडूंब भरतात. मात्र, यंदा पावसाने चांगलीच दांडी मारल्याने उन्हाळ्यात पाण्याची चिंता कायम राहणार आहे. पावसाळ्याचे महत्त्वाचे तीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ७४.४० टक्केचजलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पाण्याची गरज लक्षात घेता आतापासूनच पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र मान्सून उशिराने दाखल झाला जूननंतर जुलैमध्ये पावसाने काही प्रमाणात जोर धरला. मात्र, जुलैमध्ये सुद्धा फत दोनच दिवस दमदार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात एकच दिवस पावसाने दमदार पाऊस बरसला. त्यामुळे धरणांत काही प्रमाणात पाणीसाठा वाढला. अधून मधून पावसाच्या सरी पडल्या. गत काही आठवड्यांपासून दमदार पाऊस नसल्याने धरणांच्या ५ जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतात. काही प्रकल्पांमधून अतिरित पाण्याचा विसर्गही करावा लागतो. मात्र, यंदा सप्टेंबरचा मध्य उलटूनही एकाही मोठ्या प्रकल्पाने शंभर टके पाणीपातळी गाठलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांसह पाणीपुरवठा यंत्रणेची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये बोर प्रकल्पात ७४.५० टके, निम्न वर्धा ८१.२५ टके, धाम ७१.३१, पोथरा ८८.४५, डोंगरगाव ४९.५७, मदन ३४.२६, लाल नाला ५५.१७ टके, वर्धा-कार नदी प्रकल्पात ७७.३९ टके, तर सुकळी लघू प्रकल्पात ४९.७७ टके जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. काही प्रकल्पांमध्ये साठा तुलनेने चांगला असला तरी अनेक प्रकल्प अद्याप निम्म्याच्या आसपासच आहेत.
...चौकट...
दीड महिना निर्णायक
धरणांमधील उपलब्ध पाण्यावर शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे. याशिवाय उद्योग आणि विविध वापरासाठीही या जलसाठ्याचा उपयोग होतो. त्यामुळे पुढील दीड महिन्यात दमदार पाऊस झाला नाही आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शयता आहे. परिणामी, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.