एलनिनोच्या पृष्ठभूमीवर पाणी टंचाईचा आढावा

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
वर्धा,
wardha water scarcity planning यावर्षी सरासरी पर्जन्यमान आणि प्रकल्पांतील जलसाठा तुलनेने कमी होण्याची शयता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे नियोजन करताना ते आतापासूनच केले पाहिजे. जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा आणि त्याचा वापर यावर प्रशासनाचे सातत्याने लक्ष ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
 

wardha water scarcity, water shortage wardha, pankaj bhoyar, el nino maharashtra, wardha water crisis, wardha district administration, water scarcity planning, water conservation wardha, wardha dams water storage, maharashtra water shortage, special water scarcity plan, wardha villages water supply, tanker water supply wardha, farmer loan waiver scheme, ahilyadevi holkar farmer loan waiver 
एलनिनोच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई, प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व त्याचा वापर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आ. सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे आदी उपस्थित होते.
अनेक गावांमध्ये छोट्या तलावांमधून पाणी पुरवठा केला जाते. असे तलाव जानेवारी, फेब्रुवारीतच सुकण्याची शयता आहे. असे होत असल्यास पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तलावांमधील कृषी पाणी पुरवठा खंडीत करावा लागल्यास त्याचा देखील पर्याय देणे महत्वाचे असल्याचे आ. सुमित वानखेडे म्हणाले.
 
 
जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्ह्यातील सध्याचे पर्जन्यमान व उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती दिली. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या ६२ टके पाणीसाठा आहे. मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये साठा बर्‍यापैकी असून लघु प्रकल्पांत तुलनेने कमी आहे. टंचाई परिस्थितीसाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
एलनिनोच्या पृष्ठभूमीवर संभाव्य wardha water scarcity planning पाणी टंचाई पाहता जिल्ह्यात विशेष टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यात १७९ गावांमध्ये २५१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. त्यात ५९ सार्वजनिक विहिरी खोल करणे, १४२ खाजगी विहिरींचे अधिग्रहण, २९ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, १५ नवीन विंधन विहिरी व काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठ्याचा समावेश आहे. पाणी स्त्रोतांचे तीन स्तरावर नियोजन करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमुती योजनेचा आढावा
 
 
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुती योजनेचा आढावा घेतला. जिल्ह्यात या योजनेंतर्गत बँकस्तरावर ७४ हजार ३६५ कर्जखाते अपलोड करण्यात आले आहे. त्यापैकी ४८ हजार १६५ शेतकरी पात्र आहे. ३१ हजार ६९४ शेतकर्‍यांची ई-केवायसी झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन याद्यांमध्ये २३ हजार ३३० शेतकर्‍यांचा समावेश असून त्यांच्या खात्यात २३० कोटींची रकम जमा करण्यात आली आहे.