मुंबई,
Golmal5रोहित शेट्टी ‘गोलमाल’ गँगची धमाल-मस्ती मोठ्या पडद्यावर परत आणण्यासाठी सज्ज झाला आहे. या कॉमेडी फ्रँचायझीमधील पाचवा भाग, ‘गोलमाल-५’ लवकरच येत आहे. रोहित शेट्टीने त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. निर्मात्यांनी ‘गोलमाल-५’ चे नवीन पोस्टर समाज माध्यमावर प्रदर्शित केले.
या चित्रपटात अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, शर्मन जोशी, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर दिसत आहेत. रोहित शेट्टीने चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये हास्य, मजा, आनंद आणि कुटुंब... बाकी काही नाही. ८ जानेवारी, २०२७, असे लिहिले. तर चित्रपटाच्या पोस्टरवर हा चित्रपट ८ जानेवारी, २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, असे लिहिले आहे. ‘गोलमाल-५’ मध्ये या फ्रँचायझीमधील अनेक ओळखीचे चेहरे परत येत आहेत, ज्यामुळे पाचव्या भागाबद्दल जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.