तीन वाहनांच्या अपघातात तीन ठार; तीन गंभीर

तळेगाव (रघुजी) शिवारात विचित्र अपघात

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
खरांगणा (मो.), 
accident in the Talegaon (Raghuji) वर्धा - आर्वी मार्गावर तळेगाव (रघुजी) शिवारामध्ये तीन वाहनांच्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज शनिवार १९ रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास झाला. वर्धेकडून आष्टीकडे दोन ट्रॅटर जात होते. त्यावेळी आर्वीच्या दिशेने जात असलेले एम. पी. ०४ वाय. के. ४७९३ क्रमांकाचे आयशर वाहन ट्रॅटरला ओव्हरटेक करत होते. याचवेळी आर्वीकडून वर्धेच्या दिशेने एम. एच. ३७ डी.टी. ९७४८ क्रमांकाचे टिप्पर येत होते. दरम्यान, आयशर वाहन आणि टिप्परची धडक झाली. यावेळी अनियंत्रित टिप्पर ट्रॅटरला धडकले. यामुळे दोन्ही ट्रॅटर उलटले. या विचित्र अपघातात टिप्पर चालक राजकुमार भीमराव चचाने रा. हिवरखेड जि. अमरावती, आयशर चालक मकसूद हसन मेहमूद हसन रा. ओबीदुल्लागंज रायसेन मध्य प्रदेश, ट्रॅटर चालक शशिकांत जनार्दन सावरकर रा. वडगाव (खुर्द) या तिघांचा मृत्यू झाला तर अजमीन हसन मकसूद हसन रा. ओबीदुल्लागंज, गजानन विठ्ठल नान्हे, गजानन आंबटकर हे तिघे जखमी झाले. 
 
 
accident in the Talegaon
 
 
अपघाताची माहिती मिळताच खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मदत केली. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. क्रेनच्या मदतीने वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाणेदार अंबादास टोपले, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मोहरले, अविनाश नवराते, अंकुश साबळे, महेश कावळे, सैनिक संदीप अवथळे, शुभम तिवारी, नितीन देऊळकर, सुनील पाचंगे, गौरव नासरे, दशरथ लांडे यांनी घटनास्थळी मदत कार्य करत पंचनामा केला. पुढील तपास खरांगणा (मोरांगणा) पोेलिस करीत आहेत.