शिवनी बस अपघातातील जखमींना योग्य उपचार द्या

सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |

Co-Guardian Minister Adv. Ashish Jaiswal
 
 
गडचिरोली,
शिवनीजवळ काल शुक्रवारी झालेल्या बस अपघातातील जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची माहिती सहपालकमंत्री ड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि गावंडे यांच्याकडून घेतली. जखमींवर योग्य उपचार करून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अपघातातील एकूण 38 प्रवाशांना सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. त्यापैकी 7 प्रवाशांना उपचार आवश्यक असलेल्या दुखापती झाल्या असून, 31 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच सामान्य रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यात आली. सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समन्वयातून जखमींवर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत.