डॉ. नेते यांनी केली अपघातातील जखमींची पाहणी

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
गडचिरोली, 
गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ काल शुक्रवारी दुपारी प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात असताना बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात एका चिमुकल्यासह सुमारे 38 प्रवासी जखमी झाले. या सर्व जखमींची माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी रुग्णालयात धाव घेत भेट घेऊन विचारपूस केली.
 

ased4 
 
 
गडचिरोली शहरापासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर शिवणी गावाजवळ हा अपघात घडला. बसमध्ये प्रवासी असल्याने अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी तत्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अपघातातील जखमी रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला.