पुरात वाहून गेली कार, आठ जणांचा मृत्यू

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |

आगर मालवा,
flood accidentभाविकांना घेऊन जाणारी एक कार पुरात वाहून गेली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत व्यक्ती ओडिशाचे रहिवासी हाेते़ ही घटना शनिवारी नळखेडा जिल्ह्यातील माँ बगलामुखी माता मंदिराजवळील तुडुंब भरलेल्या नाल्यात घडली़.
 
mpacc
 
मृत भाविकांनी उज्जैनहून नळखेडा येथील माँ बगलामुखी माता मंदिराला भेट देण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली होती. दर्शनानंतर परत येत असताना मुसळधार पावसामुळे मंदिराजवळील नाल्याला पूर आला होता़ या पुरात कार अडल्याने ती जाेरदार प्रवाहात वाहून गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर कार तुडुंब भरलेल्या नाल्यातून बाहेर काढली. मात्र ताेपर्यंत कारमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला होता.
 
 
जोरदार प्रवाहादरम्यान ओलांडला नाला
चालकाने जोरदार प्रवाहादरम्यान घाईघाईने नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे गाडी अडकून वाहून गेली, असे प्राथामिक तपासात समाेर आले आहे. तथापि, अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. या अपघातात तीन मुले, दोन महिला आणि तीन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती ओडिशाचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये राधारानी, ज्ञानेंद्र कुमार बेहरा, त्यांची पत्नी रीटा राणी, कृष्ण राजवीर यांचा समावेश आहे. तर पोलिस उर्वरित मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.