पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केली पिकांची पाहणी

एलनिनोच्या पृष्ठभूमीवर उपाययोजना करण्याचे निर्देश

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
वर्धा, 
Guardian Minister inspects crops. एलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान तुलनेने बरेच कमी झाले आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये देखील पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शयता आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी १९ रोजी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.आर्वी तालुयातील खरांगणा येथे प्रत्यक्ष बांधावर जात पालकमंत्री भोयर यांनी सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार सुमित वानखेडे, उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, भाजपाचे माजी अध्यक्ष सुनील गफाट, भाजपाचे महामंत्री अशोक कलोडे, माजी सरपंच नीलिमा अकलवार, माजी उपसरपंच राजेश अवथळे, मंडळ अधिकारी अनिल जगताप उपस्थित होते.
 
 

Guardian Minister 
 
गेल्या महिन्यात तब्बल २० दिवस पावसाचा खंड पडला. या महिन्यात देखील पावसाचा खंड असल्याने सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या नाही. हातचे पीक जाण्याची शयता आहे. सोयाबीन झालेच तर सरासरी उत्पन्न फार कमी असेल, अशी खंत शेतकर्‍यांनी व्यत केली. शेतकर्‍यांचे म्हणणे, त्यांच्या भावना पालकमंत्र्यांनी जाणून घेतल्या. काही शेतकर्‍यांनी वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास असल्याने त्यावर वनविभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची मागणी केली.पावसाअभावी कापूस, सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात घट होण्याची शयता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सर्व संबंधित विभागांना आवश्यक सूचना केल्या आहे. आपण देखील सर्व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. कृषी आणि महसूल विभागास पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना केल्याचे पालकमंत्री भोयर म्हणाले.
 
 
राज्य शासन कायम शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. शेतकर्‍यांचा कर्जाचा भार कमी करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुती योजना शासनाने आणली. जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. एलनिनोमुळे कमी पर्जन्यमान होऊन नुकसान सोसावे लागल्यास निश्चितच शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम शासन करेल, असेही डॉ. भोयर यावेळी म्हणाले. यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी देखील शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.