‘प्लास्टिक कचरा’ मोठे आव्हान!

पर्यावरण रक्षणासाठी मोदींचे जगाला आवाहन

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi's appeal to the world to protect पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर भारत जगासोबत एकत्रितपणे काम करत असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने नवे मानदंड निर्माण करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हरित अधिकरणाच्या वतीने आयोजित ‘द फ्यूचर ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट डायनॅमिक्स’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. ही परिषद १९ आणि २० सप्टेंबर रोजी होत आहे.
 

Modi 
 
यावेळी मोदी यांनी पर्यावरण संरक्षण, अक्षय ऊर्जा, कार्बन उत्सर्जन, सौर ऊर्जा, विद्युत वाहने, जलसंवर्धन आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांत भारताने केलेल्या कामाचा उल्लेख केला. प्लास्टिक कचरा ही मोठी पर्यावरणीय समस्या असल्याचे सांगत त्यांनी कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण रक्षणात प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी अनेकदा विकसनशील देशांवर चुकीच्या पद्धतीने टाकली जाते, असेही त्यांनी नमूद केले.
 
भारताचा दरडोई कार्बन उत्सर्जनाचा वाटा आजही जागतिक सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. विकसित देशांमध्ये भारताच्या तुलनेत दरडोई कार्बन उत्सर्जन सहा पट अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे वास्तव भारत जागतिक व्यासपीठांवर ठामपणे मांडत असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिषदेला पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांसह सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.